1. पर्यावरण प्रकल्प: स्वच्छ शाळा, हरित परिसर
1. पर्यावरण प्रकल्प: स्वच्छ शाळा, हरित परिसर
प्रस्तावना
पर्यावरणाचे रक्षण हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. शाळा ही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे केंद्र असते, त्यामुळे शाळेचा परिसर स्वच्छ आणि हरित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. या प्रकल्पाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे.
विषयाचे महत्त्व
1) स्वच्छता आणि हरितता यामुळे आरोग्यदायी वातावरण तयार होते.
2) विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण होते.
3) पर्यावरणीय समतोल राखण्यास मदत होते.
4) शाळेचा परिसर आकर्षक आणि प्रेरणादायी बनतो.
प्रकल्पाची उद्दिष्टे
1) शाळेचा परिसर स्वच्छ ठेवणे.
2) झाडे लावून हरित पट्टा तयार करणे.
3) विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करणे.
4) कचऱ्याचे वर्गीकरण व पुनर्वापराचे महत्त्व समजावणे.
प्रकल्प कार्यपद्धती
शाळेच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबविणे.
विद्यार्थ्यांच्या सहभागाने वृक्षारोपण करणे.
कचऱ्याचे ओले व सुके प्रकारात वर्गीकरण करणे.
घोषवाक्य, आयोजित करणे.
पर्यावरण विषयक माहितीपत्रक तयार करणे.
शाळेच्या आवारातील कचरा गोळा करणे
• वर्गखोल्या, ग्रंथालय, प्रयोगशाळा यांची स्वच्छता
• ओला व सुका कचरा वेगवेगळा गोळा करणे
• कचरापेट्यांची योग्य ठिकाणी स्थापना
प्रत्येक विद्यार्थ्याला एक रोप लावण्याची जबाबदारी
इयत्ता ५ ते १२ वी च्या विद्यार्थ्यांनी २०८६ लावलीत.
घोषवाक्ये (Slogans)
• "स्वच्छ शाळा, सुंदर शाळा – आमचा अभिमान!"
• "झाडे लावा, जीवन वाचवा!"
• "स्वच्छता हीच खरी सेवा!"
• "हरित परिसर, निरोगी जीवन!"
• "कचरा योग्य ठिकाणी – आरोग्यदायी भवितव्याची तयारी!"
• "पर्यावरण वाचवा, पृथ्वी वाचवा!"
• "शाळा स्वच्छ ठेवूया, पर्यावरण जपूया!"
• "एक विद्यार्थी – एक झाड!"
1) परिसरात प्लास्टिकचा वापर कमी झाला.
2) विद्यार्थ्यांनी नियमितपणे परिसर स्वच्छ ठेवण्याची सवय लावली.
3) झाडांची निगा राखली जात आहे.
4) शिक्षक आणि पालकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
प्रकल्प माहितीचे विश्लेषण
विद्यार्थ्यांचा सहभाग वाढला.
परिसरातील स्वच्छतेचा दर्जा सुधारला.
पर्यावरण विषयक ज्ञानात वाढ झाली.
शाळेच्या प्रतिमेत सुधारणा झाली.
निष्कर्ष
"स्वच्छ शाळा, हरित परिसर" प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण झाली. शाळेचा परिसर अधिक स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी बनला. हा उपक्रम इतर शाळांनीही राबवावा अशी शिफारस करता येईल.
संदर्भ
• महाराष्ट्र शासनाचे पर्यावरण शिक्षण पुस्तिका
• शालेय विज्ञान मासिके
• स्थानिक पर्यावरण कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन नगरपालिका मुख्याधिकारी,मुख्याध्यापक श्री. एम. एस. वाघ सर व सर्व पदाधिकारी व शिक्षिका श्रीमती जयश्री के.चव्हाण यांचे मार्गदर्शन.
Comments
Post a Comment